तपास योग्य झाल्यास सरकारही पडेल, कंगना रनौतने केले ट्विट

CM Uddhav Thackeray-Kangana Ranaut.jpg

मुंबई : तब्बल 13 तासांच्या अटकेनंतर अखेर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली आहे. वाझे यांना अटक झाल्यानंतर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले असून सत्ताधारी बॅकफूटवर गेले आहेत. या प्रकरणानंतर विरोधकांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा राजीनामा मागितला असून सत्ताधाऱ्यांनी एनआयएला (NIA) सदसदविवेकबुद्धीने कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. आता या प्रकरणावर कंगना रनौतने एक ट्विट करत या प्रकरणाविषयी भाष्य केलं आहे. या ट्विटमध्ये कंगनाने (Kangana Ranaut) या प्रकरणातील सत्य बाहेर आले तर ठाकरे सरकार पडेल, असे वक्तव्य केले आहे.

शिवसेनेनं (Shiv Sena) सत्तेत आल्यावर निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेतले. योग्य तपास झाला अनेक गोष्टी बाहेर येतील, यासोबतच सरकारही पडेल, असे ट्विट कंगनाने केले आहे. दरम्यान, एनआयएने सांगितल्यानुसार, आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER