सरकारविरुद्ध द्रोह करणा-या पोलिसांची नावे गृहमंत्र्यांनी जाहीर केली नाही तर,.. – प्रकाश आंबेडकर

Anil Deshmukh & Prakash Ambedkar

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले असल्याच्या बातम्या सकाळी माध्यमांमध्ये आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

यावर विरोधी पक्ष भाजपने राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही हे प्रकरण उचलून धरले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या प्रकरणी थेट आंदोलनाचाच इशारा दिला आहे. ते म्हणाले, राज्यातील काही अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या पोलिसांनी सरकार पाडण्याचा कट रचला त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, हा सरकारविरोधातील द्रोह आहे, त्या अधिकाऱ्यांना मोक्का आणि एनआयए अंतर्गत पकडले गेले पाहिजे अशी आमची विनंती आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच, प्रकाश आंबेडकरांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ती नावे जाहीर केली नाही तर, त्यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धरणे धरु, आंदोलन करु, पोलीस अधिकारी असले तरी त्यांना द्रोह करण्याचा अधिकार नाही. शिक्षा झालीच पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे. हा बॉल आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात आहे त्यामुळे याबद्दल काय करायचं ते त्यांनी ठरवावं असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते लोकमतशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER