बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील – संजय राऊत

फिल्मसिटी कुठेही झाली तरी कलाकार मुंबई सोडून जाणार नाहीत,

Sanjay Raut

मुंबई :  बिहारमध्ये (Bihar) लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून संजय राऊत (Sanjay raut)यांनी कंगनाच्या कांगाव्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.

बिहारमध्ये विकासाच्या, कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे. पण जर मुद्दे संपले असतील तर मुंबईतून पार्सल होतील असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ते एएनआयशी बोलत होते.

संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीवर (Bihar Election) प्रस्न ऊभे केले आहे. ते म्हणाले, कोरोना संपलाय का ? तसेच ‘बिहार निवडणुकीसाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,”

“विधानसभेची मुदत संपत असेल तर निवडणूक झालीच पाहिजे. पण बिहारमध्ये कोरोना संपलाय का हेदेखील पाहिलं पाहिजे. जर कोरोना संपला नसेल तर तुम्ही निवडणूक कशी घेणार आहात, प्रचारसभा कशा होणार?. मतदान तर ऑनलाइन करु शकत नाही, त्यासाठी जाऊन रांगेत उभं राहावं लागेल. सोबत मतदानाची टक्केवारीही कमी नाही झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असून गरीब लोक आज घराबाहेर पडत नाहीयेत. बिहार एक मोठं राज्य आहे. देशाच्या राजकारणात बिहारचं महत्व आहे. त्यामुळे तिथे निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे ? काय व्यवस्था करण्यात आली आहे हे देशाला सांगावं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी बनणार असल्याची घोषणा केली आहे. कंगना रणौत शिवसेना वादात त्यांच्या या घोषणेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न केल्यानंतर राऊत त्यांनी फिल्मसिटी कुठेही झाली तरी कलाकार मुंबई सोडून जाणार नाही अशा आशयाची प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “मुंबईत अनेक लोक उत्तर प्रदेशातील आहेत. स्पॉट बॉयपासून ते अनेक मोठे दिग्दर्शकही तेथील आहेत. अमिताभ बच्चनदेखील अलाहाबादचे आहेत. जर देशात अन्य कुठे फिल्मसिटी होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. कलाकार तर मुंबई सोडणार नाहीत. ते इथलं घर सोडून तिथं फिल्मसिटीत जाऊन राहतील असं तर होणार नाही. फिल्मसिटी फक्त शूटिंगसाठी वैगेरे असते. हैदराबादमधील रामोजी फिल्समिटीत मराठी कलाकार जाऊन शूटिंग करतात. विदेशातही जाऊन शूटिंग होत असते. ही इंडस्ट्री पाच लाख लोकांना रोजगार देते”.

दरम्यान, बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER