
मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला. १३ दिवसांपासून राजधानी दिल्लीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. यावरून सरकारच्या धोरणावर खाजगीरणाच्या धोरणावर टीका करताना काँग्रेसचे नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्विट केले – शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षित लोकं रस्त्यावर आले असते तर ना विमानतळे विकली गेली असती, ना रेल्वे स्टेशन, ना LIC, ना BPCL विकली जाती, ना बेरोजगारी वाढली असती, ना जीडीपी घसरला असता.
उद्या (९ डिसेंबरला) शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिले आहे. राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसला. बंदमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. राज्यातील अनेक मंत्री देखील या आंदोलनात सामील झाले होते.
काश किसानों की तरह पढ़े लिखे लोग भी सड़को पर आ जाते,
न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न LIC, BPCL बिकती, न नौकरी जाती, न बेरोजगारी बढ़ती, न जीडीपी गिरती
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) December 8, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला