मागण्या १५ दिवसांत मान्य नाही झाल्या तर अण्णा उतरणार शेतकरी आंदोलनात

Anna Hazare

राळेगणसिद्धी :- दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने १५ दिवसांत मान्य केल्या नाहीत तर मी आंदोलनात उत्तरेन, असे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी म्हटले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ राळेगणसिद्धला येऊन अण्णांना भेटले तेव्हा अण्णांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन आंदोलनात उतरण्याची तयारी दर्शवली होती.

मात्र, या वयात अण्णांनी आंदोलन करू नये, अशी विनंती या शिष्टमंडळाने केली होती. त्यामुळे अजून अण्णा आंदोलनात उतरले नाहीत; पण आता अण्णांनी सरकारला १५ दिवसांचा वेळ देऊन आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा म्हणाले होते की, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर शेवटचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी करेन.

अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती करण्यासाठी विधानसभेचे माजी सभापती व भाजपाचे नेते हरिभाऊ बागडे, राज्यसभा खासदार भागवत कराड यांनी नुकतीच अण्णांची भेट घेतली होती व आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी १५ दिवसांचा वेळ मागितला होता, हे उल्लेखनीय.

ही बातमी पण वाचा : आंदोलनाकडे पाठ फिरवून मोदी गुरुद्वारात पोहोचले, तरी दिल्लीच्या सीमेवरील पंजाबचा शेतकरी विचलित झाला नाही – सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER