सहकार यशस्वी झाला तर तो ‘अमुलच’ रुप घेतो…ही आहे ‘टेस्ट ऑफ इंडीया’ची कहाणी!

AMUL - Anand Milk Union Limited - Maharashtra Today

महाराष्ट्राच्या अर्थकारणात सहकाराची भूमिका मोठी आहे. कापूस आणि ऊस उत्पादक पट्ट्यात साखर कारखाने आणि सुतगिरण्यांनी मोठ्या प्रमाणात विकास घडवून आणला. स्वतंत्र झाल्यानंतर आर्थिक संकटातून वाट काढणाऱ्या विकसनीशील देशांसाठी सहकार उद्योग वरदान ठरले.

पण २००० साल उजाडलं आणि सहकारात मोठ्या प्रमाणात भ्र्ष्ट्राचार वाढीस लागला. कारखाने, शेतकऱ्यांचे पैसे बुडाले, बँका रस्त्यावर आल्या. सहकारी संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या आणि महाराष्ट्राचा आर्थिक स्तर घसरायला सुरुवात झाली, अशा अनेक स्तरांतून आपण सहकारावरच्या टिका ऐकत असतो. सहकारावर अनेक टिका टिप्पण्या आजच्या परिस्थीतीमुळं होत असल्या तरी ‘अमुल’कडे बघितलं तर सहकारक्षेत्र किती मोठं होऊ शकतं.. आणि किती जणांचा उद्धार होऊ शकतो याची प्रचिती तुम्हाला येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून अमुलची (AMUL) उत्पादनं बाजारात विश्वसनीयता टिकवून आहे. ‘ द टेस्ट ऑफ इंडीया’ ही अमूलची स्लोगन आता त्याची ओळख बनलीये. अमूलच्या जाहिरीती पाहिल्या नसतील, जिंगल्स ऐकल्या नसतील असा एकही माणूस सापडणार नाही. भारतासह जगभरात हातपाय पसरणाऱ्या या उद्योगाची स्थापना ९४६ला झाली होती.

सुरुवात

दुग्ध व्यवसायाच्या सहाकारी आंदोलनातून अमूलचा जन्म झाला. गुजरातच्या खेडाजिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून काही दुग्ध व्यवसायिक अत्यल्प दरात दुध गोळा करायचे. मुंबईत विकायचे. यातून शेतकऱ्यांना म्हणावा तसा फायदा होत नव्हता. १९४२ला या शेतकऱ्यांनी सरदार पटेलांना गाठलं. परिस्थीती सांगितली. शेतकऱ्याची बाजू ऐकल्यानंतर पटेलांनी पुढाकर घेत तिथं सहकाराचा पाया रोवला. यातून खेडाजिल्हा सहकारी दुध उत्पादक संघटनेची स्थापना झाली.

निवडक शेतकऱ्यांनासोबत घेवून या दुग्ध व्यवसायाला सहकारी रुप देण्यात आलं. पुढं १९४८ पर्यंत ४३२ शेतकरी जोडले गेले. झपाट्यानं या व्यवसायाची होत असलेल्या वाढीमुळं अडचणीही निर्माण झाल्या. मागणीपेक्षा दुधाचे उत्पन्न वाढू लागले. यावर उपाय म्हणून दुग्धप्रक्रिया अधारित व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर दुधापासून बटर आणि मिल्क पवाडर बनवायच्या व्यवसायाला सुरु झाली.

अमूलचा जन्म

अमुल हा शब्द संस्कृतच्या ‘अमुल्य’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्याचे कोणीही मोल करु शकत नाही असा याशब्दाचा अर्थ होतो. अमुल नावाच्या स्वप्नाला सत्तात उतरवलं ते ‘डॉ. वर्गिस कुरीयन’ या दुरदृष्टी असणाऱ्या माणसानं. १९४९ला त्यांनी स्वतःला अमूलशी जोडून घेतलं शासकीय कर्मचारी म्हणून ते डेअरीच्या गुणवत्तेवर काम करण्यासाठी तिथं रुजु झाले होते.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीच्या नव्या क्लुप्त्या त्यांनी शोधून काढल्या. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळं भारतात दुधाचं उत्पादन वाढलं. भारतीय दुग्ध उत्पादक आता देशाची भूक भागवून इतर देशातही दुध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्यात करतायेत. याचे श्रेय डॉ. कुरियन यांना जाते. दुध उत्पादनकात झालेल्या ‘श्वेत क्रांती’साठी डॉ. कुरियन यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.

१९५५ च्या ऑक्टोबरमध्ये नव्या डेअरीची स्थापना करण्यात आली. अमुलची स्थापना झाली. म्हशीच्या दुधापासून पहिल्यांदा दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आनंद मिल्क युनियन लिमिटेड (Anand Milk Union Limited) या उद्योगाचे ‘अमुल’ हे संक्षिप्त रुप आहे.

डॉ कुरियन यांच्याकडे कमालीची दुरदृष्टी होती. त्यांनी आखलेल्या ध्येय धोरणातून दुग्धउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिकरित्या स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. दुग्धव्यवसायाच्या अर्थशास्त्रात लहान दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचा त्यावेळी विचार केला जात नसे. त्यामुळं लहान सहान दुग्ध संकलन केंद्राच्या भरभराटीसाठी त्यांनी काम केलं. दुध संकलकांना गुणवत्तेच्या नियंत्रणासाठी अधिकार मिळावेत म्हणून गुजरात सहकारी दुध विक्री संघ (जी.सी. एम. एम. एफ)ची स्थापना १९७३ला करण्यात आली. यामाध्यमातून सहा जिल्ह्यातील दुध आणि दुग्धजन्य पदार्थांची भारतभर विक्री करणं शक्य झालं.

पुरस्कार आणि सन्मान

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं गुणवत्ता टिकवणून ठेवणाऱ्या या संस्थेला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलय. यामध्ये १९९९ला राजीव गांधी गुणवत्ता पुरस्कार, २००१-१०ला निर्यातीसाठी सुवर्ण चषक, २०१४ला मार्केटींग कॅपेनिंगसाठी पुरस्कार. आंतराराष्ट्रीय स्तरावर जागितक दुग्ध व्यापारासाठी सर्वोतकृष्ट सहा दुध डेअरींच्या यादीत अमुलनं स्थान पटकावलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER