एवढी काळजी आधीच केली असती तर… राहुल गांधी यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी सुनावले

Rahul Gandhi - Jyotiraditya Scindia

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टोमणा मारला- ‘ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये (Congress) असते तर आता मुख्यमंत्री दिसले असते. पण सध्या ते भाजपमध्ये (BJP) ‘बॅक बेंचर’ बनले’. यावर ज्योतिरादित्य (Jyotiraditya Scindia) यांनी राहुल गांधींना सुनावले- ‘राहुल गांधी यांना आता जेवढी काळजी आहे, तेवढी त्यांनी त्यावेळी करायला हवी होती; जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. यापेक्षा अधिक मला काही बोलण्याची गरज वाटत नाही.

उशिरा जाग
मध्यप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा याबाबत राहुल गांधींना टोमणा मारताना म्हणालेत, राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांची काळजी करावी. तेही शिंदे यांचे मित्र आहेत. सर्वकाही गमावल्यानंतर राहुल गांधी याबाबत बोलत आहेत.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ज्योतिरादित्य शिंदे १८ वर्षे काँग्रेसमध्ये होते. गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. शिंदे यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारही काँग्रेसमधून बाहेर पडले. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळले. त्यानंतर भाजपाचे शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. ज्योतिरादित्य शिंदे यांना जूनमध्ये भाजपाने राज्यसभेवर पाठवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER