अशी सीबीआय चौकशी लावेल माय-बाप दिसेल…, भावना गवळीची भाजपा आमदाराला धमकी

Bhavana Gawli and MLA Rajendra Patni

वाशिम :  वाशिमच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप(BJP) आमदार आणि शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्यात शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर यावेळी भावना गवळी यांनी थेट त्या आमदाराला घरात घुलून मारेल अशी धमकी दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या चकमकीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल (Video Social media Viral) झाला आहे.

शिवसेना खासदारभावना गवळी आणि भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झालीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्येही या व्हिडिओचीच दिवसभर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी (Bhavana Gawli and MLA Rajendra Patni) यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद होण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले. त्यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद होते, परंतु त्यावर दोन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत होते. परंतु या मतभेदाचा बांध प्रजासत्ताक दिनी फुटला असून नागरिकांत चर्चेला उधाण आले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे

खासदार भावना गवळी यांनी भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना थेट धमकी दिल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. जास्तीचे नाटकं नाही करायचे, तुला घरात घुसून मारेन… अशी सीबीआय चौकशी लावेल माय-बाप दिसेल, असे खासदार गवळी यांनी म्हटल्याचे या व्हिडिओत ऐकू येत आहे. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली असून एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात राजकीय चर्चेला उधाण आले. जिल्हयात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्हयाचा विकास करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्व सामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER