स्टीव्ह जॉब्जनं पहिला आयफॉन लाँच करण्याचं धाडस उलटलं असतं तर अॅपलच साम्राज्य धुळीत मिळालं असतं !

Maharashtra Today

ज्या दिवशी पहिला आयफोन लाँच (iPhone Launch) केला गेला तो दिवस फक्त स्टीव्ह जॉब्जसाठी ( Steve Jobs 0 नाहीतर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा दिवस होता. मोबाईल जगातातलं क्रांतीकारी उपकरण त्यादिवशी दुनियेसमोर आलं. पण यामागची गमंत अशी आहे की, ज्यादिवशी आयफोन लाँच झाला त्यादिवशी तो बनलाच नव्हता. असं असतानादेखील जॉब्ज स्टेजवर आले आणि त्यांनी आयफोन लाँच केला.

त्यांच्या ९० मिनीटांच्या प्रेझनटेशनमध्ये त्यांनी अक्षरशः लोकांना वेड्यात काढलं. त्यांनी कुणालाच कळू दिलं नाही की त्यांचा फोन बेकार आहे. त्यांनी असं का केलं या प्रश्नाचं उत्तर अनेकांना अजूनही मिळालेलं नाही.

लॉंचिंगच्या दिवशी आयफोन तयार नव्हता

स्टीव्ह जॉब्ज आणि अॅपलसाठी २००७ हे वर्ष महत्त्वपूर्ण वर्ष होतं. याच वर्षी मोबाईल जगात क्रांती होणार होती. तंत्रज्ञानाच्या जगताचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद असल्याचं अॅप्पलच म्हणणं होतं. या फोनची बरीच वर्ष आधीपासून बाजारात चर्चा होती; पण हे मोबाईल उपकरण असेल कसं? दिसेल कसं? याची कुणालाच कल्पना नव्हती. अनेकांनी तर्क लावले होते की आयपॉडचं दुसरं मॉडेलच बाजारात येतंय. आयपॉडहून दहापट जबरदस्त उपकरण बनवायच्या विचारात स्टीव्ह जॉब्ज होते. आयफोन बनवणं हे जॉब्ज यांच स्वप्न होतं असं मानलं जातं.

लॉंचिगची तारीख जवळ येत होती. आयफोन पुर्णपणे बनून तयार नव्हता. आयफोनमध्ये बऱ्याच कमतरता आहेत. त्यावेळेत पुर्ण होणं शक्य नाही. लॉंचिग डेट पुढं ढकलावी असं त्यांच म्हणनं आलं. आयफोनच्या प्रतिक्षेत अक्ख जग होतं. जर अशा नाजूक वेळी लॉंचिंग पुढ ढकललं तर मोठी पंचाईत होईल. कंपनीच नाव खराब होईल याची त्यांना जाणीव होती. आयफोनमध्ये गाणं वाजवायला सुरुवात केली तर ते पुर्ण व्हायचं नाही. अर्ध्यातच ते गाणं बंद व्हायचं. इमेल उघडला तर फोन बंद पडायचा. यासाठी लागणारे प्रोग्रॅमच बनून तयार झाले नव्हते. यातून वाट काढण्यासाठी जॉब्ज यांनी ‘गोल्डन पाथ’ अवलंबला. त्यांनी जे कोणते फंक्शन फोनमध्ये चालू आहेत त्यांच्याच जोरावर प्रझेन्टेशन देण्याचं ठरवलं.

नाहीतर डेव्हलपर्सच काही खरं नव्हतं

२९ जून २००७ या दिवशी संपूर्ण जग आयफोनची वाट पाहत होतं. तर दुसऱ्या बाजूला स्टीव्ह जॉब्ज चिंतीत होते. प्रझेन्टेशन सादर करताना फोनमध्ये काही बिघाडी येऊ नये असं त्यांना वाटत होतं. त्यांनी बटणाचं कि- पॅड हटवून पहिल्यांदा फोनच्या स्क्रीनवर कि बोर्ड देण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांना हा प्रयोग आवडणार नाही अशी त्यांना खात्री होती.

पुर्णपणे तयार नसलेला आयफोन बग्जमुळं अडकेल अशी त्यांना खात्री होतीच. स्टीव्हपेक्षा त्यांच्या डेव्हलपर्संना याची दांडगी चिंता लागली होती.

अडचणींवर केली मात

स्टीव्ह जॉब्ज यांनी विकसप्रक्रियेत असणारा आणि पुर्णपणे तयार नसणारा आयफोन घेऊन प्रेझेंनटेशनसाठी उभे राहिले. संपूर्ण जगाची त्यांच्यावर नजर होती. फोनमधली एक खराबी यावेळी घडली असती तर अॅपलचं साम्राज्य धुळीस मिळालं असतं. इतकी गंभीर परिस्थीती असतानासुद्धा जॉब्ज यांनी रिस्क घेण्याच ठरवलं. प्रत्येक फिचर व्यवस्थीत चालणार चार- पाच आयफोन घेऊन ते स्टेजवर चढले होते. ही गोष्ट न त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहिती होती ना प्रेक्षकांना. सर्वांना वाटलं स्टीव्ह एकाच फोनचा वापर करतायेत.

नेटवर्क व्यवस्थीत येत नसलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी प्रेझेन्टेशन हॉलमध्येच पोर्टेबल टॉवर ठेवला. यामुळं फुल रेंज मिळाली. इंटरनेट कनेक्ट व्हायला जास्त वेळ लागला नाही. यासर्व जुगाडाच्या भरोशावर स्टीव्ह यांनी सलग ९० मिनीटं आयफोनचा डेमो दिला. कोणतीची गडबड झाली नाही. आयफोन व्यवस्थीत लाँच झाला. केवळ जुगाडाच्या भरोशावर जॉब्ज यांनी मोठी जोखीम उचलली होती, आणि या कठीण प्रसंगी भाग्यानं बलवानाला साथ दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button