ठरलं तर… मराठा आरक्षणाचा मोर्चा १६ तारखेपासून; विनायक मेटेंची माहिती

Vinayak Mete - Maharashtra Today

बीड :- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाजानी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाने पुन्हा मोर्चे काढण्याचा निर्धार केला आहे. आज बीडमध्ये मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर १६ मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झाले आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण कायदा रद्द केला. या संदर्भात बीडमध्ये बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना मराठा आरक्षणासंदर्भातील निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन संपल्यावर १५ तारखेला मोर्चाचे आयोजन केले आहे. या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात मोर्चे काढणार असल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिली. पहिल्या मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार आहे.

“मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा द्यावा. मराठे गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर उतरतील.” असा इशाराही विनायक मेटे यांनी दिला आहे.

ही बातमी पण वाचा : मराठा समाजाला आरक्षण देणे ‘ठाकरे’ सरकारचे कर्तव्य, आणि ते पार पाडणारच – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button