स्थिती सुधारली नाही तर दिवाळीपूर्वी २५ टक्के व्यवसाय कायम बंद होण्याची भीती

Shop Close

मुंबई : कोरोनाबाबतची (Corona) स्थिती दिवाळीपूर्वी सुधारली नाही तर सध्या बंद असलेल्या व्यवसायातील २५ टक्के व्यवसाय कायम बंद पडतील, अशी भीती महाराष्ट्र उद्योग फेडरेशन ( Federation of Associations of Maharashtra ) चे अध्यक्ष विनेश मेहता यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की, मुंबईत आतापर्यंत फक्त ७० टक्के दुकानेच उघडली आहेत. बंद असलेल्या ६० हजार व्यवसायात बहुसंख्य किरकोळ श्रेणीतील आहे. लोकल बंद असल्यामुळे कामगार कामाच्या ठिकाणी पोहचू शकत नाहीत.

गेल्या ६ महिन्यायपासून कामगार घरी बसून आहेत. सण – उत्सव साजरे होणे बंद आहे. लोक फक्त अन्न – धान्य विकत घेत आहेत. दुकाने उघडली तरी फार कमी लोक घराच्या बाहेर निघतात. फक्त किराणा दुकानात लोक दिसतात. गर्दी टाळण्यासाठी इतर खरेदीत ऑनलाइनला लोक प्राधान्य देत आहेत.

किरकोळ विक्रेता वेल्फेअर अससोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा म्हणाले की, मुंबई खुली झाली आहे पण – कर्मचाऱ्यांची मर्यादित संख्या, दुकाने उघडी ठेवण्यासाठीही सायंकाळी ७ ची मर्यादा अशा बंधनांमुळे मुंबईतील सुमारे २ लाख लहान – मोठ्या दुकानांपैकी ६० हजारपेक्षा जास्त दुकाने बंद आहेत. सध्याची स्थिती पाहता हे वर्ष असेच जाईल, असे दिसते. मार्च २०२१ नंतर स्थिती सुधारेल, अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER