शरद पवारांनी अधिकारानं सुनावलं तर मी नक्कीच गप्प बसेन – गणेश नाईक

Ganesh Naik-Sharad Pawar

नवी मुंबई :- ‘मला इन्कम टॅक्स, ईडी किंवा कुठल्याही गुंडाकडून भीती नाही. माझा हात स्वच्छ आहे. मला आमदार आणि नामदारपद हवं नव्हतं. शरद पवारांना कारण माहिती आहे, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का म्हणून सोडला.

त्यांनी अधिकारानं मला काही सुनावलं तर मी काहीच बोलणार नाही.’ असं उत्तर भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलं. राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शाब्दिक वादावादी झाल्यानंतर नाईकांनी भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर आमदारकीमुळे अन्याय झाला, म्हणून मी पक्ष सोडला.

मी राष्ट्रवादीमध्ये २० वर्षे काम केलं होतं. मला आतापर्यंत शरद पवार काहीही बोलले नाहीत. त्यांनाही माहीत आहे, की मी पक्ष कशासाठी सोडला. मलाही माहिती आहे, की मी काय गमावलं. माझ्यावर आमदारकीमुळे अन्याय झाला. त्यामुळे पुत्र संदीप नाईक, संजीव नाईक यांनी सांगितलं की, तुम्ही पक्षासाठी २० वर्षं काम केलं, तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तर आम्ही सगळे पक्ष सोडणार. त्यामुळे आम्ही पक्ष सोडला, अशी कबुली गणेश नाईक यांनी दिली.

‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल’ ; गणेश नाईकांचे आव्हाडांना प्रत्युत्तर


Web Title : ‘If Sharad Pawar speaks with authority, I will be silent’ – Ganesh Naik

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)