महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा; संभाजीराजेंनी मनावर घेतल्यास ताजेपणा येईल – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar - Sambhaji Raje - Maharashtra Today

पुणे :- मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) हे आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पुण्यात पोहचले. या दोन नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. मराठ्यांना आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका असल्याचं दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, येणाऱ्या सरकारला आरक्षणाचा मुद्दा त्रासदायक ठरेल, सरकार चालवणं अशक्य होईल. आरक्षण समाजाला व्यवस्थेशी जोडते.

आरक्षणाबाबत राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती हवी तरच होईल. राजकीय पक्षांना मराठा आरक्षणात नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रातील राजकारणात शिळेपणा आला आहे, तो ताजेपणा हवा. जर संभाजीराजेंनी मनावर घेतलं तर ताजेपणा नक्कीच येईल. शरद पवारांचं राजकारण मी गेली अनेक वर्षे पाहतोय. शरद पवारांची (Sharad Pawar) भूमिका नरो वा कुंजरोवा. आपण अपेक्षा करू की शरद पवार हेसुद्धा येत्या काळात आरक्षणाबाबत काही तरी भूमिका घेतील. संभाजीराजेंची भूमिका महत्त्वाची आहे. आरक्षण हे जसं समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं साधन आहे, तसं  ते अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह  प्रिंसिपल आहे; पण राजकारणी ते मान्य करायला तयार नाहीत. हा प्रश्न पुढे घेऊन जायचा असेल तर राजसत्तेचा पर्याय आहे. पहिली घटनादुरुस्तीसुद्धा आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button