‘तो’ अहवाल प्रसिद्ध होताच ठाकरे सरकार पडेल; भाजप नेत्याचा दावा

CM Uddhav Thackeray - Ashwini Upadhyay

नवी दिल्ली :- काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीशी (NCP) हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपात (BJP) कमालीची कटुता निर्माण झाली आहे. अर्णव गोस्वामींना (Arnab Goswami) झालेल्या अटकेवरून दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या एका बड्या नेत्याने पुन्हा एकदा ठाकरे सरकारबाबत मोठा दावा केला आहे.

माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्थापन केलेल्या एन.एन. वोहरा समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध केल्यास तत्काळ महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पडेल, असा दावा भाजपा नेते अश्विनी उपाध्याय यांनी केला आहे. तसेच हा अहवाल तातडीने प्रसिद्ध केला जावा, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे.

एन. एन.  वोहरा यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक १०० पानांचा अहवाल तयार केला होता. त्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या कुख्यात गुन्हेगारांशी राजकीय नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या असलेल्या संबंधांबाबत खळबळजनक माहिती होती. या अहवालातील केवळ १२ पानेच प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, या नेत्यांची माहिती कधी प्रसिद्ध केली जाईल, अशी विचारणा उपाध्याय यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) आणि पीएमओला टॅग करत उपाध्याय यांनी ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाने वोहरा समितीच्या अहवालावर कारवाई करण्याची सूचना केंद्र सरकारला दिली होती. मात्र २३ वर्षे होत आली तरी आतापर्यंत वोहरा समितीच्या अहवालावर कुठलीही कारवाई झाली नाही. तसेच हा अहवाल सार्वजनिकही करण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER