रेमडेसिवीर इंजेक्शन्स तातडीने मिळाले नाही तर… भाजप नेत्याचा इशारा

Sudhir Mungantiwar

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची कमतरता भासत आहे. जिल्ह्यात काेरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना मागणी आणि पुरवठा यातील तफावत वाढतच चालली आहे. त्यामुळे इथल्या रुग्णांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. हा पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा, अन्यथा भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिला आहे.

मुनगंटीवार यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना पत्रदेखील पाठवले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘आपण नाशिकला सात हजार इंजेक्शन उपलब्ध केले, मुंबई व नागपूरसाठीसुद्धा इंजेक्शन उपलब्ध केले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यासंदर्भातच असा सापत्न भाव का? नागपूरच्या डेपोमध्ये आज इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे समजते. आपण त्वरित दोन हजार इंजेक्शन चंद्रपूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करावे.

चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना, मंत्र्यांनी या संदर्भात कार्यवाही केली नसल्याबद्दल मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून न दिल्यास आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button