राठोडांचा राजीनामा घेतला तर, मुख्यमंत्र्यांना आणखी एक राजीनामा घ्यावा लागेल – राणे

Narayane Rane & Uddhav Thakeray

मुंबई :-  पुजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही एक्शन घेण्यापुर्वीच एका वृत्तवाहीनीच्या माहितीनुसार गेले तीन – चार दिवस नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांनी मातोश्रीवर थेट आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. मात्र, यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

त्यातच नारायण राणे (Narayan Rane) यांनी या राजीनाम्यावरू मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीत बसलेले मुख्यमंत्री (CM Thackeray) घेणार नाहीत. कारण तसे केले तर अशाच एका जुन्या प्रकरणावरून आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागेल असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

राणे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर ताशेरे ओढताना हे सरकार जनताच पाळेल असेही त्यांनी पुन्हा म्हटले आहे. राज्याची तिजोरी रिकामी आहे. ती भरण्यासाठी यासरकारकडे कोणतेच नियोजन नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबाराअजून कोरा झाला नाही. यांच्यात ताळमेळ नसल्याने हे सरकार पडणारच यावर आपण ठाम आहोत असे राणे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेविरुद्ध बोलणाऱ्या महिला खासदारावर अ‌ॅसिड फेकण्याची धमकी; सेनेच्या लेटरपॅडचा उपयोग !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER