राहुल गांधींना अध्यक्ष व्हायचे नसेल तर दुसऱ्याला करा- अभिषेक मनु सिंघवी

Rahul Gandhi & Abhishek Manu Singhvi

दिल्ली : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अध्यक्ष व्हायचे नसेल तर दुसऱ्या व्यक्तीची निवड करायला हवी, असे मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षामध्ये अध्यक्ष निवडीचा प्रश्न सतत विचारला जातो आहे. सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्ष निवडीलाही लवकरच वर्ष पूर्ण होत असून, पक्ष लवकरच अध्यक्ष निवडण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या संदर्भात एका मुलाखतीत सिंघवी यांना प्रश्न विचारला होता की, सोनिया गांधी यांना हंगामी अध्यक्ष होऊन वर्ष झाले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दलची अनिश्चितता कायम आहे. अजूनही तुम्ही म्हणता की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अभिषेक मनु सिंघवी अध्यक्ष का होऊ शकत नाही?

याच्या उत्तरात सिंघवी म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष व्हायचे नसेल तर दुसऱ्या व्यक्तीची निवड करायला हवी, असे मत काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले की, सध्या आमची परिस्थिती वाईट आहे. पण असे म्हणणे चूक आहे की, राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो आहोत की, राहुल गांधी यांनी पुढाकार घ्यावा; पण त्यांना समोर यायचे नसेल तर त्यांची इच्छा. यावर निर्णय घेऊन नवीन अध्यक्ष निवडला जावा. अनिश्चितता अशीच राहायला नको. यामुळे नुकसान होऊ शकते. काही आठवड्यांमध्ये यावर तोडगा निघेल. कुणी तरी अध्यक्ष होईलच आणि तो निवडणुकीतून होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER