पाणी घेतल्याचे सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेईन : दत्तात्रेय भरणे

Dattatray Bharane - Maharastra Today
Dattatray Bharane - Maharastra Today

सोलापूर : जिल्ह्यातून एक थेंब पाणी घेतल्याचे सिद्ध केल्यास मी आमदारपदाचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे. उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेऊन गेल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी दत्तात्रेय भरणे यांच्यावर केला आहे.

दत्तात्रेय भरणे यांच्यावर सोलापूरसाठी नियोजित पाण्यातून उजनी धरणाचे ५ टी एम सी इंदापूरकडे वळविल्याचा आरोप होता. हा आरोप सिद्ध झाल्यास मंत्रीपद नव्हे, तर आमदारकीचा राजीनामा देऊन संन्यास घेईल. जिल्ह्यातील नियोजित पाण्याचा एक थेंबही इंदापूरसाठी घेतलेला नाही. माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, असे दत्तात्रेय भरणे म्हणाले.

प्रणिती शिंदेंना पालकमंत्री करा; भाजप नगरसेवकांची मागणी

पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ९०० रेमडेसिवीर इंजेक्शन इंदापूर येथे नेल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याविरोधात भाजप नगरसेवकांनी निषेध केला. पालकमंत्र्यांच्या विरोधात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील काळे कपडे आणि काळ्या टोपी घालून नियोजन भवनात दाखल झाले होते. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली. भाजपा नगरसेवक सुरेश पाटलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूरचे पाणी पळवल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांनी निषेध व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button