योग्य तपास झाला असता तर आज पर्यावरण मंत्री वेगळा असता, निलेश राणेंची टीका

Nilesh Rane - Aaditya Thackeray - Maharastra Today

सिंधुदुर्ग : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरण आणि गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळल्याने भाजपने महाविकास आघाडी सरकारला चांगलच कोंडीत पकडले आहे. या दोन्ही प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे मुख्य संशयित आरोप असून त्यांच्याविरोधात पुरावे देखील समोर येत आहेत. तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांपर्यंत भाजपने (BJP) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) कोंडी केली आहे.

दरम्यान, ‘सरकारे येतात जातात पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणातही भाजपाने केंद्रीय तपास यंत्रणांना व माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केले. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचे चित्र निर्माण केले गेले. आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत.’ अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

आता, नाना पटोले यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील लक्ष्य केलं आहे. ‘नाना पटोले साहेब चुकीचं बोलले, ते म्हणाले विरोधकांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात फक्त टीका केली. तर ते खरं नाही कारण जर त्यावेळी मधल्या ७० दिवसात पुरावे नष्ट केले नसते आणि तपास योग्य झाला असता तर आज पर्यावरण मंत्री वेगळा असता.’ असे ट्विट निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER