हिंदुत्ववादी शिवसेनेने मुस्लीम आरक्षण दिल्यास आंदोलन करू; विश्व हिंदू परिषदेचा इशारा

World Hindu Council-Shiv Sena

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय विविध मुद्द्यावर गाजताना दिसत आहे. शेतक-यांच्या कर्जमाफीपासून, महिलांवरील अत्याचार अशा प्रकरणांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता मुस्लीम आरक्षणावरून सभागृहात मत मतांतरे पाहायला मिळणार आहे. मुस्लीमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे मुस्लीमांच्या आरक्षणासाठी शिवसेनेने हिरवा कंदील दिला आहे. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेवर विश्व हिंदू परिषदेने टीका केली आहे. “हिंदुत्ववादी शिवसेनेचा मुस्लिम आरक्षणाचा विचार दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच,
धर्माच्या आधारावर ठाकरे सरकारने आरक्षण देऊ नये, जर आरक्षण दिल्यास आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचा असर व्हायला लागला आहे. जर राज्यात मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिलं, तर विश्व हिंदू परिषद आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील सरकारने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी अध्येदेश काढला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार देखील सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून कायदा तयार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या धोरणांचा सांधाबदल; मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा