वीजेचे खासगीकरण झाल्यास , वीज ही चैनीची बाब ठरेल, नितीन राऊतांनी व्यक्त केली भीती

Nitin Raut

मुंबई : वीज वितरण क्षेत्रात एकाधिकारशाही मोडून काढण्याच्या नावाखाली खासगी क्षेत्रांत वीज क्षेत्र घुसवण्याच्या केंद्राचा प्रस्ताव आहे. मात्र यामुळे सामान्य जनता आणि गोरगरिबांसाठी वीज ही चैनीची बाब ठरेल,” अशी भीती ऊर्जामंत्री (Minister of Energy)  डॉ नितीन राऊत (Nitin Raut) व्यक्त केली आहे.

वीज निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्या विजेची मागणी जास्त असेल त्या काळात सुनियोजित पद्धतीने वीज निर्मितीचे उत्पादन घटवून विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करतात. त्यानंतर ऊर्जा क्षेत्रात गेमिंग ऑफ जनरेशन असंही म्हणतात. मागणी इतका पुरवठा नसल्याचे कारण पुढे करुन मग वीजेचा दर वाढवला जातो, असा जागतिक पातळीवरील अनुभव आहे.

भारतात असे झाले तर वीज ही अत्यावश्यक गरजेची गोष्ट आहे. ती महागल्याने गरिबांसाठी मध्यमवर्गीय लोकांसाठी चैनीची बाब बनून त्यांच्या आवाक्याबाहेर जाईल,” असे नितीन राऊत यांनी नमुद केले.

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना मंत्री नितीन राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी राज्य शासनाच्या मालकीच्या वितरण कंपन्या कार्यरत असतानाही वीज वितरण क्षेत्रात खासगी कंपन्यांनाही प्रवेश देण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. यामुळे वीज वितरण क्षेत्रात काही मोठ्या लोकांची मक्तेदारी निर्माण होते. या कंपन्या सर्वसामान्यांची लूट करतात. अशामुळे ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांत घरगुती वीज ही महागडी वस्तू बनली आहेत, असे नितीन राऊतांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER