…तर सत्ता भ्रष्ट होते; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

pandharpur-bypoll-shivsena-expelled-rebeal-shaila-godse-filed-nomination-against-ncp-bhagirath-bhalke

मुंबई : सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. ते राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

“मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिक लोकांच्या हातात गेली पाहिजे आणि हे मान्य असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला आपण सत्तेत वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे.” असे पवार म्हणालेत.

मी मुख्यमंत्री असताना ग्रामपंचायत, गावचे पोलीस पाटील यामध्येही ओबीसी आणि इतरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील एका गावात गेलो असता चहासाठी एका घरी गेलो होतो. तिथे जुने काही कार्यकर्ते होते. त्यांनी मला – साहेब हे काम काही चांगले केले नाही म्हटले. आमच्या गावची पाटिलकी गेल्यावर कसे व्हायचे असे ते म्हणाले. यावर नुकसान काय, असे विचारले असता ते उत्तर देऊ शकले नाहीत. पुन्हा पाच ते सात वर्षांनी भेट झाली असता गाव आता पूर्वीपेक्षा एकत्रित आहे, असे त्यांनी सांगितलं. याचे कारण पिढ्यानपिढ्या सत्ता आमच्या घरात ठेवली होती. सत्ता अधिक लोकांच्या हाती गेली हे लोकांना आवडले हे त्यांनी सांगितले, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button