हो सके तो लौट के वापस आना : सुधीर मुनगंटीवर

Sudhir Mungantiwar & Eknath Khadse

मुंबई : एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. जयंत पाटलांच्या घोषणेनंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी यावर प्रतिक्रिया देत हो सके तो लौट के वापस आना’ अशी साद खडसेंना घातली आहे

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुनगंटीवर म्हणाले, खडसेंनी जाऊ नये अस मनापासून वाटतं. त्यांचा हा पक्षप्रवेश भाजप पक्षासाठी धक्कादायक बाब आहे. खडसेंचे पक्षासाठी असलेले योगदान हे खूप मोठे आहे. त्यामुळे पक्षाने चिंतन करण्याची गरज आहे. ते अत्यंत जवळचे सहकारी होते. ‘हो सके तो लौट के वापस आना’ असे म्हणत खडसेंना मुनगंटीवार यांनी साद घातली आहे.

तसेच, खडसेंचा पक्षांतर्गत सुरु असलेला वाद संपेल असं मला वाटायचं, पण जे होतंय ते दुःखदायक आहे. खडसेंचा राजीनामा ही आमच्यासाठी निश्चितचं चिंतनाची बाब आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे तर “खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी” हेच आम्ही म्हणू शकतो.” अशी भावनिक प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER