पवारांनी माझ्याविषयी चर्चा केली असेल तर चांगले समजतो – एकनाथ खडसे

Sharad Pawar - Eknath Khadse

जळगाव : मुंबईत (Mumbai) बुधवारी सकाळपासूनच भाजपचे (BJP) नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. खडसेंना पक्षात घेण्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आता खुद्द खडसे यांनी याबाबत मौन सोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ खडसे याांनी दिले आहे. तसेच मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. मला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shiv Sena) या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बोलावणे आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत माझी चर्चा होत असेल तर हे मी चांगले समजतो. असे म्हणत त्यांनी पुन्हा संभ्रम वाढवला आहे.

तर दुसरीकडे जळगावातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतेही खडसेंना पक्षात घेण्यास अनुकूल आहे. खडसे यांच्या पक्षप्रवेशास कुणीही विरोध केला नाही. शरद पवार यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. आता निर्णय तेच घेतील. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी दिली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी भाजपाला मोठा धक्का देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER