‘ऑक्सिजनचा साठा केला असता तर कदाचित जीव वाचले असते’ : अतुल भातखळकर

Atul Bhatkhalkar - Maharastra Today
Atul Bhatkhalkar - Maharastra Today

मुंबई : अपुऱ्या आरोग्य साधनांमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने एका तासात ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरून आता भाजपने महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनला आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे केली आहे.

“पुण्यात आत्तापर्यंत कोरोनाने अंदाजे ५ हजार मृत्यू झाले असून काल ससून इस्पितळाच्या शवागृहात ३० प्रेते ठेवण्यात आली होती. मृतांचा आकडा वाढतच आहे. पुणे शहर मृत्यूचा सापळा बनले असून राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्यासारखी अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे.” असे अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी म्हटले आहे.

“ढिसाळ व्यवस्थापन आणि अज्ञात कारणांमुळे उस्मानाबाद येथील ऑक्सीजन प्लांटची क्षमता गेल्या वर्षभरात निम्म्यावर आली आहे. थोडा वेळ टक्केवारी बाजूला ठेवून इथे लक्ष दिले असते, तर कोरोना रुग्णांना ऑक्सीजन पूरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली नसती.” असेदेखील अतुल भातखळकर ट्विटच्या माध्यमातून म्हणाले.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला होता. हे सर्व रुग्ण अस्वस्थ होते, त्यामुळे यांचा मृत्यू झाला आहे, असा दावा रुग्णालय प्रशासनाने केला होता. तर आता सरकार या प्रकरणात कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button