ऐकले नाही तर वाईट परिस्थिती ओढवेल, कपिल सिब्बल यांचा काँग्रेला इशारा

Kapil Sibal

दिल्ली : बुधवारी सकाळी काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील मोठे नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्याचे धक्के अजून काँग्रेसला जाणवत आहेत. राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले असून ज्योतिरादित्य सिंदिया, जितिन प्रसाद यांच्यानंतर आता सचिन पायलट यांचा नंबर लागणार का? अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला सूचक इशारा दिला आहे.

जितिन प्रसाद यांच्यावर भाजपामध्ये प्रवेश केल्यास टीका करतानाच त्यांनी पक्षनेतृत्वालाही इशारा दिला आहे – दुसऱ्यांचे ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही. कॉर्पोरेट व्यवस्था देखील जगू शकत नाही. राजकीय पक्षांचे देखील तसेच आहे. तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल.

जितिन प्रसाद हे युपीए-२ च्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसमधील कार्यप्रणाली आणि पक्षनेतृत्व बदलाविषयी २०१९मध्ये आवाज उठवणाऱ्या जी-२३ गटामध्ये त्यांचा समावेश होता. कपिल सिब्बल देखील त्या गटामध्ये होते. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसला दिलेला घरचा आहेर महत्त्वाचा मानला जातो आहे.

कपिल सिब्बल म्हणालेत की, मला खात्री आहे की नेतृत्वाला हे माहितीये की नेमकी समस्या काय आहे. माझी आशा आहे की नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचं निराकरण केले गेले नाही हे खर आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे. आम्ही सातत्याने या अडचणींविषयी सांगत राहू. काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष झाला पाजिजे. त्यासाठी आपल्याला पुनर्रचना करावी लागेल. प्रमुखाने ऐकणेचा सोडून दिले, तर संघटना कोसळेल. आम्हाला फक्त इतकेच हवे आहे की पक्षाने आमचे ऐकावे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button