तर ना. हसन मुश्रीफ उप पंत प्रधान होतील : आ. पी. एन. पाटील

कोल्हापूर : आ. पी. एन. पाटील यांनी बँकेच्या सध्याच्या मुख्य कार्यालय इमारतीचे भूमिपूजन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर ते उपपंतप्रधान झाले. आता इ- लॉबीच्या इमारतीचे भूमिपूजन ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले आहे, मुश्रीफही भविष्यात उपपंतप्रधान होतील अशी सदिच्छा व्यक्त केली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी देणार, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. अपात्र कर्जमाफी रद्द झाल्यामुळे अनिष्ट दुराव्यात सापडलेल्या विकास सेवा संस्थांची व्याज आकारणी बंद करणार असल्याचे ना. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

केडीसीसी बँकेच्या ई- लॉबी सुविधा इमारतीचे पायाभरणी ना. मुश्रीफ यांंच्या हस्ते झाली. नाबार्डने दिलेल्या तीन मोबाईल बँकींग व्हॅन सेवेत दाखल झाल्या. यूपीआय पेमेंट, मायक्रो एटीएम व मोबाईल वन लॉन्चिंग सेवांच्या शुभारंभ कार्यक्रमात ना. हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, शेतकऱ्यासाठी काहीतरी करा, असा संचालक मंडळाच्या बैठकीत आ. पी. एन. पाटील यांचा कायम आग्रह असतो. बँक आतापर्यंत एक लाख रुपये पर्यंतच्या पिककर्जाला व्याज माफ करत होतो. पी. एन. यांच्या आग्रहामुळेच तीन लाख रुपयापर्यंतचे पिककर्जाचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधरण सभेच्या मंजूरीनंतर १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल.

कारखानदारी बुडाल्यास पियूष गोयल जबाबदार

ना. मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारचे आयात निर्यातीचे धोरण चुकत आहे. आर्थिक आरिष्ठात असलेली साखर कारखानदारी अडचणीत येत आहे. येत्या काळात केंद्राच्या धोरणामुळे कारखानदारी बुडाल्यास त्यास केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची धोरणं जबादार असतील. केंद्राने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळेच पीएम किसान योजनेतील पैसे वेळेपेक्षा अगोदर जमा केले तसेच साखर निर्यातीचे वर्षापासून रखडलेले अनुदान देण्याचाही निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER