झेपत नसेल तर अजित पवारांनी पुण्याचं पालकमंत्रिपद सोडावं, चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil & Ajit Pawar

पुणे :- पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर अजित पवार यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. एकीकडे पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या संभाव्य लॉकडाऊनच्या निर्णयाचा विरोध करत अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. पुण्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. मात्र पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाहीत. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष घालायला हवं. पुणे (Pune) जिल्ह्यात लक्ष घालायला त्यांना वेळ नसेल तर पुण्याचा पालकमंत्री बदला, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामुळे आता अजित पवार या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोनानबे थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाराष्ट्रात आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. याचवेळी ते कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

ही बातमी पण वाचा : ‘राज्याच्या सद्यस्थितीला राज्य सरकारच जबाबदार’, काँग्रेस नेत्याचे थेट मोदींना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button