
अहमदनगर : दिल्लीत महिनाभराहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करेन, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला.
अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजपाचे नेते विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांनी भेट घेतली. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अण्णांसोबत चर्चा करून एक महिन्याची मुदत मागून घेतली व अण्णांनी आंदोलन करू नये अशी विनंती केली आहे. मात्र, आता अण्णांनी अश्वासनावर ना थांबता शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर जानेवारी महिनाअखेर आयुष्यातील शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला