आवश्यकता भासल्यास अण्वस्त्र प्रथम न वापरण्याच्या धोरणावर पुनर्निणय करू’, राजनाथ सिंह यांच्या इशा-याने खळबळ

rajnath-

पोखरण (राजस्थान): संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानशी असलेल्या तनावपूर्ण संबंधांच्या दरम्यान आज एक महत्वपूर्ण इशारा दिला. ते म्हणाले, भारत आपल्या आण्विक शस्त्रास्त्रांसंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करू शकतो. त्यांच्या या इशा-याने खळबळ उडाली आहे.

प्रथम ही विनाशक अस्त्र वापरायची नाहीत, असे भारताचे धोरण धोरण आहे. इतक्या वर्षात आमची हीच नीती होती. पण भविष्यात गरज पडली तर हे धोरण आम्ही बदलू शकतो, असे राजनाथ सिंह म्हणाले. ते पोखरण येथे बोलत होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 1998 मध्ये याच जागी 5 अण्विक चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. वाजपेयींच्या पहिल्या स्मृतिदिनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोखरणमध्ये होती. माजी पंतप्रधान वाजपेयींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अण्वस्त्रविषयक धोरणाविषयी माहिती दिली. भारताने नो फर्स्ट यूज(एनएफयु) या अण्वस्त्रविषयक धोरणाचा अवलंब केला आहे. 1998 मध्ये पोखरण 2 चे अणुस्फोट केल्यानंतरही ही चाचणी यशस्वी झाली. तेव्हा प्रथम भारताने ही घोषणा केली होती. शत्रुराष्ट्राविरोधात आम्ही प्रथम या विनाशक अस्त्रांचा वापर करणार नाही, असे हे धोरण सांगते.