मुंडे भगिनींनी बीडमध्ये एक जरी नवीन पाझर तलाव दाखवून दिला तर राजकारण सोडून देईल : धनंजय मुंडे

If Munde sisters show me a single tank in Beed I will giveup politics : Dhananjay Munde

बीड : मागील पाच वर्षांत बीड जिल्यात एकाही नवीन पाझर तलावाचे काम झाले नसून जर या प्रकारचा एखादा तलाव पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी दाखवून द्यावे, अन्यथा मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोदी पक्षनेते धनंजय मुंडे यानी दोन्ही मुंडे भगिनींना दिला आहे.

ही बातमी पण वाचा:- पवारांनी सपा-बसपा महागठबंधनला पाठिंबा देऊन केली काँग्रेसच्या अडचणीत वाढ

जिल्हातील 78 प्रलंबित प्रकल्पांना आघाडी सरकारच्या कालावधीत पाणी उपलब्धी प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र सत्तांतर झाल्यानंतर ते प्रस्ताव कार्यान्वित करणे येथील पालकमंत्र्यांची जबाबदारी होती पण त्या 78 प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प आमच्या दोन्ही बहीणींना गल्लीपासून दिल्ली पर्यंत त्यांचा सत्ता असताना पूर्ण करता आला नाही. आणि निधी आणता नाही, म्हणत धनंजय मुंडे यानी भाजपवर जोरदार टिका केली.

या जिल्हय़ाला दोन्ही बहिणींनी आणखी मागास केल्याचा आरोप करत धनंजय म्हणआले, जिल्ह्यात ना सिंचन प्रकल्प आले, ना रेल्वे आली, ना ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटले. जिल्ह्यात कुठला नवीन प्रकल्प आणला? रेल्वेचे डबे बनवायची फैक्ट्री या जिल्ह्य़ात यायला पाहिजे होती. मात्र ती लातूरला गेली मग ते खासदार मोठे की हे? परळी ज्योतिर्लिंग हे केंद्रांच्या गॅझेटमधून वगळण्यात आले. सगळय़ा सत्ता असतांना काही करता आले नाही. मग मुंडे साहेबांचं वारसदार म्हणून घेणारे त्यांचे स्वप्न पूर्ण करतात का? असा सवाल करत धनंजय मुंडेंनी भाजप आणि पंकजा मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यातील जनता पाणी-पाणी करत असताना खोटं आश्वासन देत तुम्ही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : रावसाहेब दानवे म्हणजे – ‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ : धनंजय मुंडें