“नटसम्राट व्हायचं असेल तर मोदींनी चित्रपटात काम करावं.” : नाना पटोले

Nana Patole - Pm Modi

नागपूर : काँग्रेसचे (Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली. त्यांनी मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली आहे. “त्यांना नटसम्राट बनायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे.” असे पटोले यांनी म्हटले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नागपुरात आले. नागपुरातील घरी जाऊन त्यांनी मातोश्रींचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर दीक्षाभूमी येथे त्यांनी दर्शन केले. तसेच ते प्रसारमाध्यमांशीही बोलत होते. विमानतळावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पटोले यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर दीक्षाभूमी, टेकडी गणपती, ताजबाग येथे दर्शन घेऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER