मोदींनी कृषी विधेयकात ‘या’ दोन ओळी टाकल्यास भाजपात प्रवेश करु – बच्चू कडू

Bacchu Kadu - PM Narendra Modi

मुंबई : केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू सेवा सुधारणा कायदा, बाजार समिती नियमनमुक्ती विधेयक आणि करार शेती विधेयक असे तीन विधेयक पास केले. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले. मात्र या कृषी विषयक विधेयकांच्या विरोधात देशभरात आंदोलने करण्यात येत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील कामगार तसेच कृषी सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) राज्यात लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना आता राज्याचे मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील विरोध केला आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ने दिलेल्या वृत्तानूसार, बच्चू कडू यांनी कृषी विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, आम्ही हे बिल जसेच्या तसे स्वीकारण्यास तयार आहोत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्याप्रमाणे नेहमी ५६ इंच छाती असल्याचे सांगतात, तसे नरेंद्र मोदींनी या विधेयकामध्ये केवळ दोन ओळी टाकाव्यात. शेतकऱ्यांना ५० टक्के नफा धरून भाव देऊ व याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं कृषी विधेयकांमध्ये नरेंद्र मोदींनी नमूद केल्यास आम्ही भाजपात प्रवेश करु, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. आता बच्चू कडूंची मागणी केंद्राने मान्य केल्यास ते भाजपात प्रवेश करतील का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER