मनसेला संपूर्ण ग्राहकांचे बिल माफ करावे हे अपेक्षित असेल तर केंद्राला सांगा- नितीन राऊत

मनसेने महावितरणचे कार्यालय फोडले; गु्न्हा दाखल करणार

Nitin Raut - MSEDCL - Raj Thackeray

मुंबई : पुणेपाठोपाठ नवी मुंबईतदेखील मनसेने वाढीव बिलाच्या संदर्भात आक्रमक होत आंदोलन केले. नवी मुंबईत आज सकाळी वाशी सेक्टर-१७ मधील महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची कार्यकर्त्यांनी तोडफोड करून वीज बिल दरवाढीचा निषेध केला. दरम्यान, या तोडफोडीविरोधी मनसे (MNS) विरुद्ध कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली आहे.

नितीन राऊत म्हणाले, मनसेला कदाचित हे अपेक्षित असेल की संपूर्ण ग्राहकांचे बिल माफ करावे तर त्यांनी केंद्र सरकारकडे याचना केली पाहिजे. केंद्र सरकारला विचारले पाहिजे की, तुम्ही डिस्काउंटला पैसे द्या. असे सांगतानाच, अशा प्रकारची तोडफोड करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल. शासकीय संपत्तीचे असे नुकसान करणार असेल तर कायद्याने त्यांना नुकसान भरपाई मागणे ही कायद्याची तरतूद आहे, ती आम्ही करू, असे नितीन राऊत म्हणाले.  ते एबीपी माझाशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER