कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णीचा अधिकार का डावलला? – भुजबळ

Chandrakant Patil - Chhagan Bhujbal

नाशिक : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांमध्ये कोल्हापूर (Kolhapur) निवडणुकीच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातून निवडून येणार या चॅलेंजवरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच, त्यांच्या त्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

‘जर कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचा अधिकार का डावलला, विधानसभेला त्यांचं तिकीट का कापलं’, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘हिंमत असेल तर कोल्हापूरमध्ये पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल.’ त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ‘जर कोल्हापूरमधून निवडून येणार होता तर पुण्यात मेधा कुलकर्णी यांचं तिकीट का कापलं? असा सणसणीत टोला भुजबळांनी लगावला.

नाशिकमध्ये आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नूतनीकरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना छगन भुजबळ जोरदार फटकेबाजी केली. तसेच, या कार्यक्रमात छगन भुजबळ आणि राज्यपालांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहण्यास मिळाली.

‘राज्यपाल यांनी वारंवार नाशिकला यावं, हवा आणि निसर्ग चांगला आहे. राज्यपालांनी नाशिकला राजभवन बांधावं. या 2 वर्षात सर्व इमारती बांधा, राज्यपाल महोदय यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होऊन जाऊ देऊ’ असा टोमणा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. यावर ‘तब तक क्या सिन रहेंगा? अशी कोपरखळी राज्यपालांनी लगावली.

आता राज्यपालांनी कोपरखळी लगावल्यावर ‘हम तब भी आपके साथही रहेंगे’ असं भुजबळांनी प्रत्युत्तर दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER