‘मराठा-धनगर एकत्र आल्यास दिल्लीचा तख्त काबीज करू’; जानकरांची पवारांना साद?

I-will-fight-against-Sharad-Pawar-from-Baramati-and-Madhu-Mahadev-Jankar-696x364

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. मात्र, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी काल सकाळी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं गेल. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या(Sharad Pawar) विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली होती.

धनगर नेते गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद यांना असलेला विरोध तीव्र होत असताना राज्यातील दुसरे धनगर नेते महादेव जाणकर हे शरद पवारांशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे. जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या कार्यक्रमात माजी मंत्री जाणकर यांनी शरद पवारांसमोर एकत्र येण्याचा प्रस्तावच मांडला.

आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहनही जाणकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जेजुरी गडावर पुतळा उभारल्याबद्दल मी मल्हारी म्हाळसाकांत ट्रस्टचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. पुतळ्याच्या उद्धटनाच्या कार्यक्रमाचे त्यांनी मला निमंत्रण दिले होते. शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन होत आहे, त्याला विरोध असण्याचे कारण नाही, ते मोठे नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, असे म्हणत त्यांनी पवारांचे गोडवे गायले. मराठा आणि होळकर समाजाची शिवाजी महाराजांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करू शकतो, असे जानकर म्हणाले.

शरद पवार यांच्या नावाला तुमचा विरोध आहे का? या प्रश्नावर देखील ते मोठे नेते आहेत, एक पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना विरोध करण्याचे कारणच नाही, याचा पुनरुच्चार देखील जानकर यांनी केला. हा सर्वपक्षीयांचा कार्यक्रम आहे, याला राजकीय वळण देण्याची गरज नाही. गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबद्दल तुमचे मत काय? या प्रश्नावर नो काॅमेटस् त्यावर न बोललेलंच बरं असे म्हणत यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER