लोकमान्य टिळक आणखी काही वर्ष जगले असते तर जिन्नांनी पाकिस्तान मागितलंच नसतं!

Maharashtra Today

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात लोकमान्य टिळकांच(Lokmanya Tilak) मोठं योगदान होतं. गांधींच्या आधी देशभर स्वीकारलं गेलेलं एकमेव नेतृत्त्व अशी टिळकांची ओळख होती. टिळकांच्या निधनानंतर शोकसभेत बोलताना महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांनी टिळकांना श्रद्धांजली वाहताना आपल्या काळातला सर्वात मोठा नेता लोकमान्य टिळक होते अशी ग्वाही स्वतः दिली होती. आजच्या राजकारणात टिळकांची प्रतिमा हिंदूत्त्वावादी अशी रंगवली जाते. टिळकांवर हिंदूत्त्वाचा शिक्का मारण्याआधी त्यांच्याबद्दल गांधी आणि मोहम्मद अली जिन्ना(Mohammed Ali Jinnah) यांची मत जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

टिळक हिंदूत्त्ववादी होते का?

टिळकांचं राजकारण पाहता त्यांना हिंदूत्त्ववादी म्हणनं तितकंस योग्य राहणार नाही. टिळक कधीच हिंदूत्त्वाचे प्रणेते नव्हते. भारताता हिंदू समाज मोठ्या प्रमाणात आहे. गणेश चतुर्थी आणि शिवजयंतीला सुरुवात करुन त्यांनी समाजाच्या एकत्रीकरणात मोठी भूमिका बजावली होती. हे सण साजरे करण्यास सुरुवात करावी याला मुस्लीम विरोधी विचार जबाबदार नव्हता. अनेक मोहरम आयोजनात टिळकांचा सहभाग असायचा. लखनऊमधल्या कॉंग्रेस अधिवेशनात त्यांनी इंग्रजांची सत्ता देशातून घालवण्याची इच्छा व्यक्त केली. इंग्रजांकडून सत्ता जाऊन मुस्लिमांच्या ताब्यात आली तरी हरकत नाही पण इंग्रज भारतातून गेले पाहिजेत असा विचार त्यांनी बोलून दाखवल्याचा संदर्भ सुधींद्र कुलकर्णी यांच्या ‘१०० एअर्स ऑफ टिलक- जिन्ना पॅक्ट’ या पुस्तकात आढळतो.

टिळकांचे राजकारण

टिळकांनी जनजागृतीसाठी ‘केसरी’ हे मराठी वर्तमानपत्र सुरु केलं होतं. या वर्तमान पत्रात मुजफ्फरपूरचे क्रांतीकारी खुदीराम बोस आणि प्रफुल चाकी यांच्यावर दोन युरोपीयन महिलांच्या हत्तेचा आरोपच्या खटल्याबद्दल लिहताना टिळकांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. या प्रकरणावर सुनावणी होताना न्यायाधीश होते जस्टिस दिनशॉ डावर आणि टिळकांचे वकिल होते मोहम्मद अलि जिन्ना. जिन्ना यांनी टिळकांची बाजू कोर्टासमोर लावून धरली. त्यांच्या वकीलीच्या ज्ञानाचं सर्वस्व पणाला लावलं. परंतू टिळकांना जामिन मिळाला नाही. टिळकांना सहा वर्षाच्या शिक्षेसाठी तुरुंगात पाठवण्यात आलं.

सर्व महापुरषांच्या राजकीय वाटचाली ह्या त्यांच्या विचारांवर अवलंबून होत्या. टिळकांच्या विचारांमध्ये तुरुंगात असताना मोठं परिवर्तन झालं. मांडले तुरुंगात असताना त्यांचे बहुतांश विचार बदलले. तुरुंगातून परतल्यानंतर त्यांच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं स्पष्ट दिसत होतं.

टिळक- जिन्ना आणि भारताची फाळणी

ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळून इतकी ७४ वर्ष उलटली तरी सीमावादामुळं भारताला रोज नव्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. परंतू टिळक अजून थोडी वर्ष जगले असते तर भारताची फाळणी झाली नसती असं सुधींद्र कुलकर्णी यांनी लिहलंय. टिळकांच्या वाट्याला आणखी काही वर्ष आली असती तर भारताचं भविष्य काही वेगळं असतं असं ते म्हणतात. टिळक काही वर्ष आणखी जिवंत असते तर भारताला फाळणीचा घाव मिळाला नसता. याला संदर्भ दिला जातो १९१६ साली टिळक- जिन्ना यांच्यात झालेला करार. हिंदू मुस्लीम एकता आणि दोन्ही समाजाची सत्तेतली समान भागेदारीबद्दल दोघांनी नवं सुत्र निर्माण केलं होतं. हे सुत्र अंमलात आलं असत तर जिन्ना यांना वेगळ्या राष्ट्रची मागणी करावी लागली नसती असं बऱ्याच राजकीय तज्ञांच आणि अधुनिक भारताच्या इतिहासावर लेखन, संशोधन करणाऱ्यांच मत होतं.

टिळकांनंतर गांधींशी जिन्नांच जुळलं नाही

जिन्ना यांना सामान्यपणे मुस्लीमांचा नेता असं सांगितलं जातं. परंतू सुरुवातीच्या काळात जिन्ना स्वतःला सर्वसामावेशक मानायचे. त्यांना राजकारणात धार्मिक रंग मिसळायचे नव्हते म्हणूनच त्यांनी गांधींच्या खिलापत चळवळीला विरोध केला होता. टिळकांच्या शेवटच्या दिवसांमध्ये जिन्ना त्यांचे निकटवर्तीय बनले होते. हिंदू- मुस्लीमांच्या एकत्रित राजकारण आणि सत्ताकारणाला दोघांनी हिरवा झेंडा दाखवला होता. परंतू १९२० साली टिळकांचा मृत्यू झाला आणि कॉंग्रेसपासून जिन्ना दुर होत गेले.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button