कंगनाला ९ तारखेला येऊ तर द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल

Kamgana Ranaot & Sanjay Raut

मुंबई : महाराष्ट्राचा मुंबईचा अपमान सहन केला जाणार नाही. कंगनाला ९ तारखेला येऊ द्या, एअरपोर्टवर तिचं शिवसेना (Shivsena) स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. संजय राऊत म्हणाले, शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशा प्रकारे घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर हा एका पक्षाचा विषय नाही.

सर्वांनी या घटनेचा निषेध करायला पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. नेते आशिष शेलार म्हणाले की, कंगनानं मुंबईला अक्कल शिकवायची गरज नाही. मात्र, हेच त्यांनी जरा अधिक जोरात बोलायला हवं होतं. महाराष्ट्र त्यांचासुद्धा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच, कंगना रणौतशी व्यक्तिगत भांडण नाही आहे.

तिनं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केली आहे. महाराष्ट्रचा, मुंबईचा अपमान करणारा कोणी असेल, मुंबईला पाकिस्तान म्हणण्याचे कृत्य हे अत्यंत गंभीर आहे- असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला थांबवा, असे आव्हान कंगना रणौतने दिल्यानंतर कंगनाला ९ तारखेला येऊ तर द्या, एअरपोर्टवर तिचा शिवसेना स्टाईलमध्ये समाचार घेतला जाईल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते ‘News-18 लोकमत’शी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER