५ दिवसात न्याय मिळाला नाही तर करणार आत्महत्या ‘त्या’ पीडितेचा इशारा

Mehboob Shaikh - Trupti Desai

पुणे : बलात्काराचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. या प्रकरणी ५ दिवसात न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करेन, असा इशारा पीडित तरुणीने आज पत्रपरिषदेत दिला.

मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण थंड्या बस्त्यात गेले होते. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली व राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला.

सर्वसामान्य आणि सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय?
तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला पण अजून आरोपीला अटक नाही. मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केला. सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देणे सुरू आहे. या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असा इशारा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER