बाळासाहेब असते तर त्यांनी प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता – नरेंद्र पवार

Narendra Pawar - Pratap Sarnaik

डोंबिवली : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याच्या बातमी संदर्भात भाजपाचे (BJP) भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार (Narendra Pawar) यांनी सरनाईकांवर टीका केली की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आज असते तर त्यांनी सरनाईकांचा कडेलोट केला असता.

या बातमीसंदर्भात बोलताना सरनाईक म्हणाले होते की, मी तानाजी मालुसरे यांच्यासारखा लढवय्या आहे यातून बाहेर पडेल. सरनाईक यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणालेत, तानाजी मालुसरे व्हायला धमन्यांमध्ये हिंदवी स्वराज्य रक्षणाचे रक्त सळसळले पाहिजे. पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये. ते शूरवीर योद्धे होते त्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही.

हिंदवी स्वराज स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांच्यासाठी प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्यासोबत तुलना करत तानाजी मालुसरे यांची बदनामी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रचीच नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नरेंद्र पवार यांनी सोमवारी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER