…नेहरूंच्या जागी इंदिरांजी असत्या तर नेपाळही भारतात सामावून घेतला असता; प्रणव मुखर्जी

Pranab Mukherjee

दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरु यांना नेपाळचे तत्कालीन राजे त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेपाळला भारतात सामावून घेण्याची ‘ऑफर’ दिली होती. नेहरूंनी ती फेटाळली, अशी माहिती भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या आत्मचरित्रात दिली आहे व जवाहरलाल नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर नेपाळ भारतात असता, असे म्हटले आहे. ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ या मुखर्जी यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन रूपा कंपनीने केले आहे.

‘My Prime Ministers: Different Styles, Different Temperaments’ या पुस्तकात प्रणव मुखर्जी म्हणतात की, “नेहरुंच्या जागी इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी ही संधी अजिबात सोडली नसती, ज्याप्रमाणे त्यांनी सिक्कीमबाबत केले.”

प्रणव मुखर्जी यांनी माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींबद्दल मत व्यक्त करताना म्हटले आहे की, “प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची वेगळी शैली होती. लाल बहादूर शास्त्री यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंपेक्षा वेगळ्या भूमिका घेतल्या. एकाच पक्षातील असले तरी परराष्ट्र धोरण, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासन याबाबतीत पंतप्रधानांमध्ये मतभिन्नता असू शकते”.

“नेपाळमध्ये राणा राजवटीची जागा राजेशाहीने घेतल्यानंतर तिथे लोकशाही रुजावी अशी इच्छा होती. नेपाळचे राजे त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेहरुंना नेपाळला भारतात समाविष्ट करुन घेण्याबाबत सुचवले होते. पण नेहरु यांनी नेपाळ एक स्वतंत्र देश असून तो तसाच राहिला पाहिजे म्हणून ही ऑफर फेटाळली,” अशी माहिती प्रणव मुखर्जी यांनी दिली.

प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावरुन त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. त्यांचा मुलगा आणि मुलीमध्ये यावरुन वाद झाला होता. प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटरवरुन चिंता व्यक्त करताना पुस्तक प्रकाशित होण्याआधी आपल्याला ते पहायचे होते, असे म्हटले होतं. तर प्रणव मुखर्जींची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर उत्तर देत उगाच अडथळा निर्माण करु नये असे मत व्यक्त केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER