भारत जिंकल्यास पहिल्या स्थानी अन्यथा तिसऱ्या स्थानी

India Vs Australia

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा (India Vs Australia) चौथा आणि अंतिम सामना ब्रिस्बेन (Brisbane test) येथे रंगतदार अवस्थेत आहे आणि या सामन्याच्या निकालावर या दोन्ही संघांचे कसोटी विश्व अजिक्यपद (World Test championship) स्पर्धेतील स्थान खालीवर होणार आहे. मात्र या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ती ही की न्यूझीलंडचा (New zealand) संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानाहून दुसऱ्या स्थानी प्रगती करेल.

सद्यस्थितीत क्रमवारीत संघांचे स्थान गुणांच्या टक्क्यांनुसार असे आहे…

1) ऑस्ट्रेलिया – 73.8 टक्के
2) भारत – 70.2 टक्के
3) न्यूझीलंड – 70.0 टक्के
4) इंग्लंड- 60.8 टक्के
5) दक्षिण आफ्रिका- 40.0 टक्के
6) पाकिस्तान- 30.7 टक्के
7) श्रीलंका- 22.2टक्के
8) वेस्ट इंडिज- 11.1टक्के
9) बांगलादेश- 0.0टक्के

या स्थितीत भारतीय संघाला क्रमवारीत दुसऱ्या स्थानाहून पहिल्या स्थानी यायचे असेल तर ब्रिस्बेन कसोटी जिंकावीच लागणार आहे. सामना अनिर्णित जरी राहिला किंवा गमावला तरी भारतीय संघ तिसऱ्या स्थानी घसरणार आहे.

दुसरीकडे हा सामना गमावला तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानाहून तिसऱ्या स्थानी घसरणार आहे. मात्र ते जिंकले किंवा सामना अनिर्णित सुटला तरी त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे.

याप्रकारे भारतासमोर प्रगतीसाठी केवळ विजय हाच पर्याय आहे दुसरा कोणताही निकाल आपली घसरण करणारा ठरणार आहे. न्यूझीलंडच्या संघाची मात्र न खेळताच एका स्थानाने प्रगती होणे कोणत्याही परिस्थितीत निश्चित आहे.

पहिल्या तीन स्थानांची संभाव्य समीकरणे अशी..

अ) ऑस्ट्रेलिया कसोटीसह मालिका जिंकल्यास
1) ऑस्ट्रेलिया – 73.3 टक्के
2) न्यूझीलंड – 70.0 टक्के
3) भारत – 66.7 टक्के

ब) भारत कसोटीसह मालिका जिंकल्यास
1) भारत – 71.6 टक्के
2) न्यूझीलंड – 70.0 टक्के
3) ऑस्ट्रेलिया – 69.2 टक्के

क) मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटल्यास
1) ऑस्ट्रेलिया – 71.3 टक्के
2) न्यूझीलंड – 70.0 टक्के
3) भारत- 68.3 टक्के

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER