फाशी द्यायची असेल तर द्या, ईडी माझ तोंड बंद करु शकत नाही – प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik

मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने (ED) कारवाईचा झटका दिल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक अखेर प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तुम्हाला फाशी द्यायची असेल तर द्या, मात्र ईडी माझ तोंड बंद करु शकत नाही, दशकांपासून मी बांधकाम आणि हॉटेल व्यवसायामध्ये आहेत. माझे सगळे व्यवहार पारदर्शक असून, कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

ईडी ही केंद्राच्या अधिकारातील संस्था आहे. भ्रष्ट लोकांना तुरुंगात डांबण्यासाठी ईडीची स्थापना करण्यात आली आहे. कंगणा रनौत आणि अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्याविरोधात आवाज उठवल्याने माझ्याविरोधात ईडीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची कल्पना मला होती. मात्र ईडी माझा आवाज दाबू शकत नाही. मी बोलत राहणार, असेही सरनाईक म्हणाले.

प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, माझ्या तसंच मुलांच्या घरी आणि ऑफिसात गेल्यानंतर ईडीच्या लोकांनी मस्त नाश्ता केला. जेवण केलं. तसेच चार- पाच वेळा चहा देखील घेतला. ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केल्याचा खुलासा प्रताप सरनाईकांनी केला आहे. घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती असल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER