मी राष्ट्रवादीत जाईल तर उघडपणे जाईल : एकनाथ खडसे

Eknath-Khadse1

मुंबई :- मी राष्ट्रवादीत (NCP) जाईल तर उघडपणे जाईल. लपून-छपून जाणार नाही. मी काही चुकीचे काम केलेले नाही, असे वक्तव्य भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव येथे केले आहे .

राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असताना गेल्या चार दिवसांपासून मुंबईत (Mumbai) असलेले भाजपचे (BJP) माजीमंत्री एकनाथ खडसे हे जळगावात परतले आहेत. ते रविवारी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत काही पत्ते उघडतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना त्यांनी मात्र, या विषयावर बोलणे टाळत मौन बाळगले. दरम्यान, जिल्ह्यातील जामनेर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की नाही याबाबत एकनाथ खडसे यांनी कोणतीही माहिती दिली नाही .

एकीकडे गेल्या महिन्यात एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचे नाव घेत थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घडामोडीत गेल्या चार दिवसांपासून खडसे हे मुंबई येथे होते. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे मंगळवारी जामनेर येथे फडणवीस यांना एकनाथ खडसे हे भाजपचे नेते म्हणून भेटतील की तोपर्यंत राष्ट्रवादी मध्ये जातील, अशीही उत्सुकता निर्माण झाली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपल्याला निमंत्रण पत्रिका आहे की नाही हे पहावे लागेल, असे खडसे यांनी शनिवारी सांगितले होते.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर; ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून सूचक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER