मला कोरोना झाला तर सरकारी रुग्णालयातच दाखल करा – फडणवीस

Devendra Fadnavis - Girish Mahajan

मुंबई : मला कोरोना(Corona Virus) झाला तर सरकारी रुग्णालयातच दाखल करा. खासगी रुग्णालये भरमसाठ बिल आकारत आहेत. सर्वसामान्य जनता सरकारी रुग्णालयात भर्ती होते, त्यामुळे मलाही मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात भर्ती करा. अन्यथा जनतेचा यंत्रणेवर विश्वास राहणार नाही. यंत्रणेवर लोकांचा विश्वास वाढायला हवा, असे फडणवीस यांनी त्यांचे सहकारी गिरीष महाजन यांना सांगितले आहे.

त्यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे. गिरीष महाजन(Girish Mahajan) यांनी याला दुजोरा दिला आहे.

महाजन म्हणाले – गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनासंदर्भात आम्ही राज्यभरात फिरत आहोत. अनेक रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला नीट उपचार मिळत नसल्याचे लक्षात आले. कोरोनाची लागण झाली की मोठे पुढारी खासगी रुग्णालयात भरती होत आहे. त्यावेळी फडणवीस मला म्हणाले की मला काही झाले तर सरकारी रुग्णालयातच भरती करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER