समन्स मिळाला तर पत्रपरिषद घेऊन सांगेन – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडी कडून पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात, समन्स मिळाला नाही असे सूचित करताना संजय राऊत यांनी सांगितले की, ईडीच्या समन्सबाबतीत मला कल्पना नाही, माहीत नाही. ईडीचे समन्स आले असेल तर मी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देईन.

या समन्सशी संबंधित चर्चेत कळते की, वर्षा याना २९ डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : पीएमसी बँक घोटाळा : संजय राऊतांच्या पत्नीला ईडीचे समन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER