माझा पराभव झाला तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार कोसळेल : ट्रम्प

Donald Trump

नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत मी पुन्हा विजयी झालो तर बाजार रॉकेटसारखा उसळी घेईल, पण पराभूत झालो तर हा बाजार पूर्णत: कोसळेल, असे भाकित अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उद्योगपती आणि कंपन्यांच्या सीईओच्या बैठकती प्रश्नोत्तराच्या सत्रात केले.

अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होऊच, असा आत्मविश्वास व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले, हेल्थकेअर, नोक-या, रोजगारांची निर्मिती, लष्कर इत्यादि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले असून करदरातही कपात केली आहे. सरकारी नियमनही अनेक ठिकाणी शिथिल केले आहे. सरकारी नोक-यांत सरकार फक्त मदत करण्याचे काम करू शकते. ख-या नोक-या तर खाजगी खाजगी क्षेत्रच निर्माण करू शकते, असे ट्रम्प म्हणाले.

अध्यक्षीय निवडणुकीत माझा पराभव झाला तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार कोसळल्याशिवया राहणार नाही. तसेच बेकारीच्या टक्केवारीचे प्रमाण 8 ते 10 टक्क्यापर्यंत वाढेल हा धोकाही त्यांनी समोर मांडला. कोरोना विषाणुच्या परिणामाबाबत ट्रम्प म्हणाले, या विषाणुचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी चीन आटोकाट प्रयत्न करत आहे. मी याबाबत चीनच्या अध्यक्षांशी बोललो असून ते या विषाणुवर नियंत्रण मिळवत आणले असल्याचे त्यांनी सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले.

भारत अमेरिका यांच्यातील 21.5 हजार कोटी रुप्यांच्या हेलिकॉप्टर खरेदीचाही त्यांनी उल्लेख केला. बैठकीला रिलायन्सचे मुकेश अंबानी, भारतीय एअरटेलचे अध्यक्ष ए. एम. नाईक, बायोकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मजूमदार शॉ, आर्सेलर मित्तलचे लक्ष्मीकांत मित्तल आदि यावेळी उपस्थित होते.