पडद्यामागून दिल्लीतून काय काय हालचाली सुरू आहेत हे जर मी सांगितलं तर सगळ्यांची पळता भुई थोडी होईल

Sanjay Raut.jpg

मुंबई :- पत्रकार अर्णब  गोस्वामींना (Arnab Gaswami) काल अटक झाली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पहिल्यांदाच एका पत्रकाराला अटक झालेली असतानाही माध्यमं अर्णबच्या बाजूने उभे न राहता त्यांच्या अटकेचं समर्थन करताना दिसत आहेत. भाजपकडून मात्र अर्णव गोस्वामींच्या अटकेवरून रान उठवले जात आहे. याच मुद्द्याला पकडून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. संजय राऊत यांनी सुशांत सिंह  प्रकरणाचं उदाहरण देत केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

सुशांत प्रकरणात वेगळी आणि या प्रकरणात वेगळी अशी केंद्रातील आणि राज्याच्या भाजपची भूमिका आहे. पडद्यामागून दिल्लीतून काय काय हालचाली सुरू आहेत हे जर मी सांगितले तर सगळ्यांची पळता भुई थोडी होईल, असे संजय राऊत म्हणाले. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये, असा टोलाही शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. तसेच, अर्णब  हा भाजपचा प्रवक्ता आहे.

म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यांना नाईक कुटुंबीयांच्या घरी जाऊन समजून घेतलं असतं तर ज्याला मन आहे, त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा काम केलं नसतं.

महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी कारवाई केली याचा राजकारणाशी संबंध नाही. अर्णब गोस्वामी हे भाजप कार्यकर्ते आहेत. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे, कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलाय हे समजायला हवं. त्याच्यावर केलेली कारवाई ही पत्रकार म्हणून नाही. त्याने कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यातून त्यांनी आत्महत्या केली आणि कोणामुळे आत्महत्या केली ते लिहून ठेवलं, जे सुशांत सिंह प्रकरणात नव्हतं, हेसुद्धा संजय राऊतांनी अधोरेखित केलं आहे.

ही बातमी पण वाचा : भाजप नेत्यांनी नाईक कुटुंबाची भेट घ्यावी ; संजय राऊतांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER