मी तिला वाचवू शकलो असतो तर… ‘त्या’ तरुणीच्या निधनानंतर सोनू सूदची भावुक पोस्ट

Sonu Sood - Maharashtra Today

मुंबई : देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या संकटमय काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकांसाठी देवदूत बनला आहे. मात्र सोनूच्या प्रयत्नांनंतरही एका मुलीचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. यामुळे सोनूला प्रचंड दु:ख झालं आहे. एका महिन्यापूर्वी सोनू सूदने नागपूरमधील एका २५ वर्षीय मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल केलं होतं.

मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर काल रात्री भारतीने अखेरचा श्वास घेतला. ही बातमी कळताच सोनूने दु:ख व्यक्त केले .ट्विट करत तो म्हणाला, नागपूरची तरुण मुलगी भारती जिला मी एअर अ‍ॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेले होते तिने काल रात्री हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला. ECMO मशीनच्या मदतीने ती महिनाभर जिवंत होती. तिच्या कुटुंबातील आणि इतर सर्व ज्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांसाठी मला वाईट वाटते . मी तिला वाचवू शकलो असतो तर… आयुष्य हे खूप अस्थिर आहे. अशा आशयाचे ट्विट करत सोनूने भावना व्यक्त केल्या आहेत.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button