मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती ; शिवसेनेच्या नेत्याचा टोला

Maharashtra Today

मुंबई :- राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. निलेश राणे यांच्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील हे सुपारीचोर आहेत, असा टोला राणे यांनी त्यांना लगावला होता. राणेंनी वांद्रे येथे घर बांधले तेव्हा रेती मीच पाठवली होती आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावे, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

माझा वाळूचोरांशी संबंध असेल तर तो निलेश राणे यांनी सिद्ध करून दाखवावा, असे आवाहनदेखील त्यांनी निलेश राणे यांना दिले आहे. दरम्यान जिल्ह्यात जी वाळूचोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळूचोरीचे हप्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे, आता पालकमंत्री आहेत आणि सुपारीचोर आहेत, अशा शब्दात काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. तसेच ती व्यक्ती सामाजिक किंवा विधायक काम करू शकत नाही. आता गुलाबराव काय युनिव्हर्सिटी आणणार, ते वाळूच चोरणार. यातले सगळे कलेक्शन त्यांच्याकडे जात असणार, असेही निलेश राणे म्हणाले होते.

ही बातमी पण वाचा : संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? निलेश राणेंचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button